प्रतिबिंब - 3

  • 6.1k
  • 2.4k

प्रतिबिंब भाग ३ सकाळी यशला जाग आली तेव्हा जाई शेजारी नव्हती. बाथरूममधे असेल असा विचार करून तो कूस बदलून झोपला. पण मग त्याला परत जाग आली. बाथरूमचं दार उघडंच होतं. त्याने दिवाणखान्यात येऊन पाहिलं, स्वैपाकघरात पाहिलं. जाई कुठेच नव्हती. मग त्याला अचानक वरचा आरसा आठवला. तो धावत वर आला. पाहतो तर, जाई आरशावर मान टेकून, जमिनीवर बसल्याजागी झोपली होती. त्याने घाबरून, तिला जागे करण्यासाठी, हलवायला सुरवात केली तशी हळूहळू तिने डोळे उघडले. अनोळखी चेहऱ्याने तिने यशकडे पाहिले आणि ती सावरून उठून बसली. "अगं इथे काय करतेस? किती घाबरलो मी. कधीपासून आहेस इथे? आणि अशी काय अवघडून झोपलीस? " जाई काहीच