फिरून नवी जन्मेन मी - भाग ६

  • 10.8k
  • 5.4k

सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश होते... शेवटी मित्रच ते, सुखाता आणि दु:खात साथ देणारे..*****कधी सुर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो अस झालेल, रात्र झाली तस आणखी एक कारण दीलं आणि ती खटारा एम८० घेऊन मी बाहेर पडलो... टर्रर्रर्रर्रर्र आवाज करत रस्त्यावरून येताना कधी कधी लोक पहायचे पन मी लय हुशार . तोंडावर रूमाल बांधलेला... पन नंबर प्लेटवर काय बांधणार...? काही वेळातच आमच्या ठिकाणावर पोहोचलो . गाडी रस्त्याच्या कडेला जरा आडोसा बघूनच उभी केली आणी शर्टच्या वरच्या खिशात कागदात गुंडाळून ठेवलेला गजरा हातात घेऊन चालू लागलो....