मरण तुमचे, सरण आमुचे

  • 13k
  • 4.5k

** मरण तुमचे, सरण आमचे !** शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुख सोयींनी युक्त असलेल्या त्या भव्य अशा इस्पितळातील अतिदक्षता विभागात नानासाहेब अत्यंत चिंताजनक अवस्थेत बसले होते. मधूनच इकडून तिकडे फेऱ्या मारताना कधी भिंतीवरील घड्याळाकडे, कधी भ्रमणध्वनीवर वेळ पाहत तर कधी खोलीतल्या पलंगावर आत्यंतिक वेदनांनी तळमळणाऱ्या पत्नीकडे... कमलाबाईंकडे बघत होते. नानांनी नुकतीच वयाची साठी पार केली होती. तर कमलाबाई साठी गाठत होत्या. दोन दिवसांपूर्वी पत्नीचे पोट अचानक फुगले म्हणून नानांनी त्यांना दवाखान्यात शरीक केले होते. डॉक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून औषधोपचारही सुरू