" पाटलांची फजिती "नुकताच श्रावण संपला होता आणि पाटलांचा फार दिवसांचा बेत त्यांनी आज आखायचा ठरवला होता. दिवसही साजेसा होता. आज बाजाराचा दिवस होता .पाटलांनी कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेला होता. आज लोकांना दिलेले उसने पैसे परत आल्यामुळे खिसा गरम होता. गावच्या इस्माईल कडे मिळणारा कडकनाथ घेऊन आज पाटील गरम खिशा निशी घरी आनंदाने गेले .त्यांनी एका हातात पिशवी आणि एका हातात पैशाची गड्डी दिली. पाटलिन बाई आज दिवसभर कामकाजामुळे दमलेल्या होत्या .त्यामुळे पाटलीन बाईंचा खिचडी करण्याचा बेत होता .प्रथम त्यांनी पाटलांना कडकनाथ बनवण्यासाठी विरोधही दर्शवला .परंतु त्यांच्या जिद्दी स्वभाव पुढे त्या