कानोसा पाकिस्तानचा डिसेंबर २०१९

  • 7.7k
  • 2.4k

कानोसा पाकिस्तानचासध्या काय काय चाललय आपल्या शेजारी राष्ट्रात? पाकिस्तानी मिडियावर, तेथील विचारक, संरक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार यांच्या चर्चांमधून भारताबद्दल काय बोलले जाते? याचा संक्षिप्त आढावा. "मी तिथे येऊन हुकूम देईपर्यंत कोणीही एलओसी ओलांडून भारत व्याप्त काश्मीर मध्ये जायचे नाही!" ही गर्जना 'वझीरे आझम' इमरान खान यांनी युनोत अमेरिकेहून केली आणि मोठा गोंधळ उडाला…!दिनांक ५ ऑगस्ट २०१९ नंतर काश्मीरचा प्रश्न आता उरला आहे काय? असेल तर त्यावर पाकिस्तानने काय करायला हवे? यावरील चर्चेत युनोत हा प्रश्न लावून धरणे इतकेच आपण करू शकतो. युद्ध तर आत्ताच्या 'हालात' मधे शक्य नाही. कश्कोल हातात घेऊन देशोदेशी फिरत असताना एका बाजूला आम्ही अण्वस्त्रेधारी आहोत.