मास्टरमाईंड (भाग- ७)

(43)
  • 40.7k
  • 3
  • 28.6k

दुसरा पुर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्रच घालवला ... तिन महीन्यांची कसर दोघांनी एका दिवसातच भरुन काढली. जॉन डॉलीला घेउन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परीसरात फिरुन आला. हिरव्या रंगाचा पुल-ओव्हर आणि काळ्या रंगाची स्लॅक घातलेली डॉली पाहुन गावकर्‍यांचे डोळे विस्फारले होते. अर्थात डॉलीला अश्या " सेकंडलुक " ची सवय होतीच. शहरातील तरूण सुध्दा डॉलीला पाहुन वळुन बघत तिथे हे तर बिच्चारे गावकरी होते. डॉली स्वतःशीच हसली आणि जॉनला घट्ट पकडुन चालु लागली. संध्याकाळी जॉन आणि डॉली दोघंही पोलिस चौकीवर गेले. जॉनने डॉलीने सुर्‍याबद्दल काढुन आणलेल्या माहीतीचा कागद पवारांना दाखवला. “ह्या कोण?”, हातातल्या कागदाकडे बघतच इ. पवार म्हणाले