तोच चंद्रमा.. - 4

  • 7.5k
  • 2.2k

४ कृत्रिम बागेत दोन आठवड्यात मी बऱ्यापैकी रूळलो होतो चंद्रावरच्या आमच्या घरात. जेटलॅग मधून बाहेर यायला तेवढा वेळ तरी लागतोच. तरीही मेलॅटोनिनच्या गोळ्या घेत होतो. बाॅडी क्लाॅक सेट झालेले आता. इकडे सलग चौदा तासाचा दिवस नि चौदाची रात्र. मी पोहोचलो तो चांद्रदिवस होता. दिवस म्हटले की प्रचंड उष्णता.. इकडे सारी घड्याळे पृथ्वीवरच्या वेळानुसार अॅडजस्ट केलेली. त्यामुळे बारा तास झाले.. सहा वाजले.. की संध्याकाळ झाली असे समजायचे. मग अंधार पडो न पडो! घराच्या आत खास अंधाऱ्या खोल्यांची रचना केली जाते इथे. चौदा दिवसांच्या रात्रीत तर बारा तास अती तीव्र दिवे लावून दिवस केला जातो! अशी चांदरात कवी कल्पनेत किती रोमँटिक