दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानं यशला उशिराच जाग आली. त्यानं घड्याळात बघितलं तेव्हा काटा दहावर आला होता. पण त्याला बेडवरून उठायची इच्छा होत नव्हती. त्याने पुन्हा डोक्यावरून ब्लांकेट ओढली. “यश, दहा वाजतायेत, आज दिवसभर झोपायचा प्लान आहे का?” जान्हवी बेडरूममध्ये येत म्हणाली. यशच्या डोक्यावरचं ब्लांकेट तिने ओढलं. “’जानु’ यार, झोपू देना थोड्यावेळ. फारच थकल्यासारखं वाटतंय.” ‘जानु?’ यशमध्ये एका रात्रीत झालेला बदल तिच्या लक्षात आला. “तुला थकल्यासारखं वाटतंय?” “हं. tired but satisfied. तुला कसं वाटतंय?” जान्हवी फक्त हसली. यशने हात पकडून तिला जवळ ओढलं. “सांग ना जानु, कसं वाटतंय?” “सोड मला. खूप कामं आहेत. आणि तुही उठ लवकर.” “तू उत्तर दिल्याशिवाय मी