अपूर्ण बदला ( भाग १८ )

  • 9.1k
  • 4.2k

काही लोक मशाली घेऊन नदीच्या दिशेने आले. सगळ्यांनाच पुढच्या संकटाची जाणीव झालेली त्यातच त्या सैतानाच्या कैदेत असलेल्या कावळ्यांनी त्यांच्या धारधार नख्याने गावकऱ्यांवर हल्ला चढवला. खुपजण घायल झाले. सर्वानी एकमेकांच्या हातातल्या मशालीनी कावळ्यांना जागीच पाडले. सगळ्या कावळ्यांना पडलेले पाहून सैतान चवताला. आणि एकदाच जोरात ओरडला त्याच्या ओरडल्याने सगळीकडे एक भीषण वादळच तयार झाले. आणि त्या वादळात तयार झाली ती त्या सैतानाची भयानक आकृती. आंब्याच्या झाडासमोरच एक काळभोर उंच भयानक खोलवर गेलेले डोळे बाहेर पडलेली बिभूले अर्धी मान तुटलेली लोंबकत जळलेल मांस भयानक दिसणारी आकृती तो सैतान आता स्पष्ट दिसू लागला. त्या भयानक सैतानाला बघून सगळेच भेदरली, त्यांचं अवसान सांडल. भीतीमुळे हात