अव्यक्त - भाग-1

(17)
  • 10.9k
  • 2
  • 4.1k

तन्वी ने निघताना एकदा आरश्यात पाहिलं आणि मग पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. 10 ला आरव ची filght land होणार. खर तर मी आता तिथे असायला हवं होतं, पण.........! नकोच तो विचार चला आपण आपल्या कामाला लागू अस म्हणून ती रूम मधून बाहेर निघाली.' तन्वी, आज थोडस लवकर ये हा ऑफिस मधून'. तिची आई तिला जाताना टोकतच म्हणाली. 'का ग आई काय झालं'? 'अग काय झालं काय, आज आरव येणार आहे ना विसरली का'? त्यांच्या कडे पार्टी आहे संध्याकाळी. 'आणि का ग, लहानपणापासून चा bestie ना तुझा तो तू खर तर जायला हवं होतं'. मला तर वाटलं तू आजची सुट्टीच घेणार