१८. नियतीचा खेळ... remaining तर इकडे ती तिच्या शहरात पोहोचली तेव्हा बराच वेळ झाला होता ... ती बसमधून उतरून घरी जातेवेळी रस्त्याच्या कडेला दिवे लागले होते , तिने मोबाईल मध्ये किती वाजले ते पाहिले तर ७:३० वाजलेले ... तिने मोबाईल परत हँडबॅगमध्ये ठेवला तर हाताला काहीतरी लागल्याचं तिला जाणवलं पण तिला घाई असल्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष करून ती पटापट पावलं उचलत घरी जात होती , काही मिनिटांतच ती घरी पोहोचली ... पण कुमारला त्या अवस्थेत पाहुन तिचं मन सारखं त्याच्या विचारांत गुंतलं होतं.. ती घरी आल्यावर , तो ठीक असेल काय ? त्याची काय हि अवस्था झाली ? या प्रश्नांनी