मी विकत घेतले ... रा-फेल!

  • 10.2k
  • 3.6k

मी विकत घेतले ... रा-फेल! 'अग, मी विकत घेतले रा-फेल.......विकत घेतले रा-फेल....' असे पुटपुटत मी माझ्या घरात शिरलो. परंतु बैठकीत बायको नाही हे पाहून मी हिरमुसलो परंतु मी एवढा आनंदित होतो की, त्या किंचित नाराजीचा माझ्या आनंदावर काहीही परिणाम झाला नाही. उलट मी जरा जास्त उल्हासित अवस्थेत आवाज दिला,"अग, अग बायकोबाई, कुठे आहेस?" तुम्हाला एक गुपित सांगतो, ज्यावेळी मी अतिशय आनंदात असतो ना त्यावेळी सौभाग्यवतीला 'बायकोबाई' याच नावाने बोलावतो. त्यापुढे जाऊन सांगतो, माझे हे संबोधन, ते व्यक्त करण्याचा खास अंदाज माझ्या पत्नीलाही खूप आवडतो. अगदी आमचे लग्न झाले