चांदणी रात्र - १५

  • 8.8k
  • 2.3k

राजेश आणि संदीप हॉटेलात पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषलीही पोहोचल्या. जेवता जेवता चौघांच्या अगदी छान गप्पा रंगल्या होत्या. जेवून झाल्यावर राजेशने घड्याळात पाहिले. रात्रीचे दहा वाजले होते. आता निघायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या व चौघेही आपापल्या घरी जायला निघाले. टेकडीवरच्या त्या क्षणांची जादू आता हळूहळू राजेश आणि वृषालीवरून उतरत होती. पूर्वीसारखेच ते आता एकमेकांशी मोकळेपणाने वागत, बोलत होते. कॉलेजमध्ये दोघांची भेट रोज व्हायची पण तिथे बोलायला फारसा वेळ मिळत नव्हता व इतर मुलामुलींसमोर मोकळेपणाने बोलताही येत नव्हतं. आज रविवार असल्यामुळे राजेशकडे वेळचवेळ होता. त्याने वृषालीला फोन लावला. “आज काय प्लॅन आहे तुझा?” राजेशने वृषालीला विचारलं. “खूप कंटाळा