अपूर्ण बदला ( भाग १७ )

  • 9.2k
  • 1
  • 4k

दुसऱ्याच दिवशी गावावर संकट येणार असे संकेत दिसत होत.नव्याचा दिवस उजाडलेला पण दिवस मात्र वाटत नव्हता.सकाळ झालेली ती पण वैऱ्याची. जिथे उन डोक्यावर यायला पाहिजे तिथे सगळ्यांच्या छतावर काळे ढग राक्षशी अवतारात अवतरलेले. देवालाही त्यांनी आव्हान केलेलं आज काहीही झालं तरी जीत हि विनाशाची सैतानाची होणार. संपूर्ण गावामध्ये अविराम शांतता पसरलेली सगळ्यांचंच अवसान पडलेले, कोणालाच धर्य नव्हते. सगळयांचाच कपाळावर आठी आलेल्या आपल्या गावावर कोप झालाय म्हणून हे भोगायला येतंय.कोणी घराच्या बाहेर पडायला मागत नव्हतं.आकाशात कावळे काव काव करून इकडे तिकडे येरझारा घालत होत. आज त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळच दिसत होते ते साधारण कावळे वाटत नव्हते. त्याचे डोळे भकास लाल झालेले आणि