सकाळी यश उठला तेव्हा जेनी शेजारी नव्हती. तो बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा त्याला खमंग उपीटाचा वास आला. किचनमध्ये जेनीने नाश्ता तयार केला होता. “काय सकाळी सकाळी छंद जोपासायला सुरवात झाली वाटतं तुझी.” यावर जेनी गोड हसली. “तसं नाही काही, काल बबनदादांसोबत बाजारात गेले होते तेव्हा थोडा रवा घेतला होता. त्याचंच उपीट केलंय. सांगा कसं झालंय?” “क्या बात है. जेनी यार, उपीट तर झक्कास झालंय.” एवढ्यात दाराची कडी वाजवत गोगटे काकू आल्या. “काय नाश्ता चालूये का जोडीचा?” “या काकू तुम्ही पण या नाश्त्याला.” “मी ही आत्त्ताच केला गो. तुमच्यासाठी हे पोहे आणले होते.” जेनीने काकूंना उपिटाची प्लेट दिली. “छान झालंय गो