वाढला टक्का मिळेल मुक्का !

  • 10.8k
  • 3.6k

वाढला टक्का मिळेल मुक्का ! विलासपूर नावाचे एक गाव. गाव तसे मोठे होते. गावात नगरपालिका होती. नगराध्यक्ष होते. तसेच नगरसेवकही होते. सहा महिन्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. गावातील पुढारी आणि बरेचसे नागरिक गावाच्या नावाप्रमाणेच विलासी होते. कदाचित पूर्वजांच्या विलासी वृत्तीमुळे गावाला विलासपूर हे नाव मिळाले असावे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत फार कमी म्हणजे बारा टक्केच मतदान झाले होते. निवडून आलेले नगरसेवक जेमतेम दहा-वीस मतांनी जिंकून आले होते. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. निकालानंतर विलासपूर गावामध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांची 'सब घोडे