एडिक्शन - 7

(11)
  • 7.7k
  • 4.1k

सकाळी साडे दहापासून तर सायंकाळी पाचपर्यंत काम करावं लागायचं त्यामुळे जेमतेम अडीच तास कॉलेज करायचो ..आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने तयारी करून सकाळीच कॉलेजला पोहोचलो ..पंकजने एम.ए.ला प्रवेश घेतला असल्याने तो माझ्यासोबत नव्हता आणि बरेच दिवस अभ्यासात खंड पडल्याने काहीच येणार नव्हतं हेदेखील माहिती होत त्यामुळे सर्वात शेवटचा बेंच पकडून बसलो ..बुक काढलं आणि काहीतरी लिहीत होतो ..तेवढ्यात ती येताना दिसली ..तिने लांबवर नजर टाकावी आणि मी दिसलो आणि तिची पावले माझ्याकडे वळू लागली ..कालच्या प्रसंगाने आधीच फजिती झाली होती त्यामुळे हृदयात आणखीच धडधड वाढू लागली ..आज पून्हा एकदा इज्जतीचा भाजीपाला होणार असल्याची खात्री पटू लागली आणि मान खाली