मास्टरमाईंड (भाग-४)

(73)
  • 75k
  • 6
  • 36.5k

शेवंताचा मृत्यु पाहुन तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिता ताईंचा मृत्य पहावा लागला होता. शेवंताच्या मृत्युने कदाचीत एवढे दुःख कुणाला झाले नव्हते. पण अनिता ताईच्या मृत्युने पुर्ण गावं हळहळला. ‘तरवडे’ गावावर एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता. गावाबाहेर असणाऱ्या शाळांना आपसुकच सुट्ट्या मिळाल्या होत्या. गावातील व्यवहार थंडावले होते. प्रत्येक जणच एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होता. गावातल्या कुठल्याही लॉज, खानावळ वर अनोळखी इसम आल्यास त्याची माहीती पोलीस स्टेशनवर कळवण्यात यावी याची व्यवस्था त्यांनी करुन ठेवली. गावातील निर्जन स्थळं, गावाबाहेरील शेतं, पडके वाडे या ठिकाणी जाण्यास गावकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला. गावात अनोळखी असा इसम कुणाच्या पहाण्यात आला नव्हता. गावाबाहेरील