तोच चंद्रमा.. - 2

  • 5.4k
  • 2.6k

२ मामाच्या गावाला! आमचे साॅफ्ट लँडिंग झाले ते इंडिया मून स्टेशन होते.. गांधीनिवास नावाचे.. इंडिया मून म्हणायचे कारण असे पाच सहा देश अजून आहेत ज्यांची अशी अवकाश स्थानके आहेत. ती त्या त्या देशाच्या नावे ओळखली जातात. म्हणजे चीनचे 'चायना मून' तर युएसएचे 'मून अमेरिका' .. जपानी 'मून जापान' वगैरे. सुरक्षा व्यवस्था अगदी कडक आहे इथे. कुणी कुठल्याही देशात जाण्यासाठी स्पेस व्हिसा अाहे. पण तो इकडे चंद्रावर आल्यावर. तिकडून डायरेक्ट इतर देशात जायला परवानगी नाही. अर्थात पृथ्वीप्रमाणे भरमसाट देश नाहीत इथे हे खरे. लोकवस्ती हल्ली वाढलीय पण पृथ्वीइतकी नाही. फक्त चंद्रावर कित्येक खनिजे इतकी मुबलक नि स्वस्तात नि जास्त