कॉलगर्ल - भाग 6

(26)
  • 34.5k
  • 1
  • 23k

सकाळी यश उठला तेव्हा त्याचं अंग दुखत होतं. रात्रभर सोफ्यावर झोपल्याचा परिणाम होता. पण आता याची सवय करून घ्यायला हवी होती. रत्नागिरीहून अप डाऊन करण्यापेक्षा हे better होतं. त्याने बेडरुममध्ये डोकावून पाहिलं. बहुदा जेनी बाथरूम मध्ये होती. त्याने दोघांसाठी चहा टाकला. “गुड मॉर्निंग! कशी झाली झोप?” “खूप छान झाली. ‘आपलं’ घरही मस्त आहे. मला खूप आवडलं.” ‘आपलं?’ यशला तिच्या बोलण्याचं हसू आलं. पण बायकांचं असंच असतं. ‘एकदा ठरवलं ना, की त्या कोणतीही गोष्ट आपलीशी करू शकतात.’ “बस ना. चहा घे.” यश तिच्या समोर कप ठेवत म्हणाला. “बरेच दिवस सुट्टी घेतल्याने माझ्यासमोर कामाचा डोंगर पडला आहे. त्यामुळे मला साईटवर लवकर जावं