चांद्रयान-२१

  • 7.9k
  • 3.1k

* चांद्रयान -२१! * चांद्रयान २० पाठोपाठ चांद्रयान २१ मोठ्या आत्मविश्वासाने, दिमाखाने, अभिमानाने, तेजाने चंद्राकडे झेपावले. भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. वैज्ञानिकांना खूप खूप आनंद झाला. चंद्राच्या त्या भूभागावर यापूर्वी दहावेळा फक्त भारतीयांनी पाय रोवत तिरंगा फडकावला होता. इतर कुण्याही देशाच्या अगोदर भारतीय वैज्ञानिक चांद्रयानाच्या आधीच चंद्रावर पाय ठेवते झाले त्यामुळे त्यांना होणारा आनंद हा साहजिक, नैसर्गिक होता. एखाद्या गोष्टीवर जो कुणी रात्रंदिवस, तहानभूक विसरून यश मिळवितो त्यावेळी मिळणाऱ्या फळाची चव तो सर्वांआधी चाखण्याची इच्छा, आकांक्षा बाळगून असतो, तो त्याचा