जुळले प्रेमाचे नाते - भाग-२०

(32)
  • 11.6k
  • 2
  • 5.7k

आजींच्या आवाजाने मला हलकी जाग आली... "प्राजु बाळा.. उठा आता." आजी हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या...... "आजी तुम्ही कशाला आणला चहा. मी आले असते खाली." मी लगेच बेडवर उठुन बसत बोलु लागले. पण तापामुळे काही केल्या जमत नव्हतं..... "हो ग तु आली असतीस..., पण तुझी तब्बेत ठीक नाहीये ना म्हणून घेऊन आले. चल आता फ्रेश होऊन ये आणि घे गप्प." आजी कप घेऊन तिथेच बसल्या. मी लगेच फ्रेश होऊन गरम चहा घेतला. त्या चहामध्ये मस्त कुटून घातलेल्या आल्याचा सुगंध आणि सोबत गवती चहाचा सुगंध ही दळवळत होता.. "वाह आजी अगदी मला आवडतो तसाच बनवला आहे तुम्ही चहा." मी चहा