अपूर्ण बदला ( भाग १५ )

  • 10.2k
  • 4.1k

आई आई तो वापस आला. त तो तो हरीला घेऊन जायला आलाय. कोण तो? आणि काय स्वप्न बघितलंस ? रम्याच्या आईने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तोच जो काळ हरीच्या घराच्या वरून जोर जोरात काहीतरी बडबडत होता. किहळत होता. काय? म्हणजे! आईला तो काय बोलतोय काय समजलं नाही. आई काल हरीच्या घरी शाळा सुटल्यानंतर गेलो होतो. आणि काही तासानंतर संध्याकाळी कोणी तरी त्यांच्या घरावर येऊन जोर जोरात ओरडत होता बाहेर जोरात वारा सुटलेला, त्यामुळे आम्ही सगळेच घरामध्ये गेलेलो , तो जे काही बोलत होता ते त्याच्या राहिलेल्या बदल्याबद्दल बोलत होता. रम्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलेले. तिने लगेच त्याला विचारले म्हणजे तू पण