लेखक- अरुण वि.देशपांडे क्रमशा : कादंबरी - जिवलगा .. भाग - २ रा ---------------------------------- शुक्रवारी रात्री ऑफिस संपवून आलेली नेहा ,सोमवार सकाळपर्यंत तिच्या सुधामावशीच्या घरी अगदी निश्चिंत मनाने राहायची . ऑफिस आणि ऑफिसचे काम ,त्यातली दगदग , त्यामुळे मनावर येणारा ताण हे सगळ ती या सुट्टीच्या दिवशी पूर्णपणे विसरून जायचे हे ठरवून टाकायची, कारण, ऑफिस मधून येतांना तीच काय आपल्यासारखे इतर देखील .अगदी मरगळून गेलेल्या मनाने आणि थकून गेलेल्या शरीराने घरी येत असतात हे ती रोजच पाहत असे. घरी आपल्या माणसात आल्यावर मनाला थोडे बरे वाटते , अस्थिर चित्त थाऱ्यावर येते. आणि मग घरात आणि आपल्या आजूबाजूच्या जगात