हनुमान जयंती

  • 6.8k
  • 2.2k

हनुमान जयंती राम नवमी नंतर आठ दिवसांनी हनुमान जयंती असते .चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात . सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करतात . नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) देतात. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात . हनुमानाला रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार करतात. या पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करतात . काही ठिकाणी या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती सुद्धा म्हणतात.महाराष्ट्रात शनिवार, तर