सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान

  • 8.9k
  • 1
  • 3.2k

*सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान !* जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बसून महत्त्वाचे टपाल तयार करण्यात मग्न असताना केंद्रप्रमुखांचे आगमन झाले. नमस्काराचे आदानप्रदान होताच केंद्रप्रमुख म्हणाले,"सर, ते टपाल राहू देत. अगोदर शाळेचा परिसर स्वच्छ करावा लागेल. कार्यालयाची, वर्गखोल्यांची सफाई करून जाळेजळमटे काढून टाकावे लागतील.""का हो, साहेब? आज कुणी येणार आहे का?" मुख्याध्यापकांंनी विचारले."आज नाही, उद्या मंत्रीमहोदय आपल्या शाळेला भेट द्यायला येणार आहेत.""काय सांगता? चक्क मंत्री शाळेत येणार? अरे, बाप रे! आता हो कसे? हा सारा परिसर स्वच्छ करायचा म्हणजे दोन तीन माणसे