वैद्यबुवांनी हरीला तपासले आणि हरीच्या बाबांकडे बघून त्यांना विचारले ह्याने कसली धास्ती घेतली होती का? म्हणजे असं काही तरी बघून तो घाबरलेला आहे नाहीतर कुठे मारामारी केली का? ह्याच शरीर पूर्णतः थरथर कापतंय. घाबरला असल्या कारणानेच त्याने ताप घेतला आहे. मी तुम्हाला काढा बनवून देतो तो त्याला पाजा मग ठीक होईल तो. असे सांगून वैद्यबुवा निघाले जाताना ते कोणालातरी धडकले असे चेहऱ्यावर हावभाव आणून मागे पुढे बघितलं. काय झालं वैद्यबुवा? बाबानी विचारलं. पण वैद्यबुवा काहीही न बोलता तेथून निघून गेले. हरीच्या आईला चांगलाच धक्का बसला होता. आणि तो साहजिकच होता तिने अगोदरही असच प्रकरण आपल्या डोळ्यांनी बघितले होते. सोबत त्याचा