मास्टरमाईंड (भाग-२)

(56)
  • 77.8k
  • 2
  • 63k

इस्पेक्टर पवार, तरवडे गावामध्ये प्रमुख पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. काही किरकोळ गुन्हे वगळता तरवडे गाव तसे शांतच होते त्यामुळे पवारांवर कामाचा असा बोजा कधीच आला नव्हता. त्या दिवशी सुध्दा घरचा चिकन-करीचा बेत ओरपुन निद्रास्त झाले होते तेंव्हाच त्यांना पोलीस स्टेशनमधुन गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवुन ते घराबाहेर पडले होते. हॉटेलचा परीसर पोलीसांच्या गाड्या, ऍम्ब्युलन्स, बाईट्स मिळवण्यासाठी आलेले पत्रकारांच्या गर्दीने गजबजुन गेला होता. खोलीमध्ये इन्स्पेक्तर पवार पंचनामा करत होते. १५ वर्षाच्या त्यांच्या काराकिर्दीत इतका क्रुर गुन्हा त्यांनी पाहीला नव्हता. फोटोग्राफर्स ने गुन्ह्याचे फोटो काढले. “चव्हाण, ठसे मिळाले का काही?” पवार “सर,