जुळले प्रेमाचे नाते - भाग-१८

(28)
  • 10.3k
  • 3
  • 5.8k

आज लवकरच कॉलेजमध्ये गेले. निशांतच्या कालच्या वागण्यामुळे त्याच्याशी बोलणं गरजेच होतं. मी गेले, म्हटलं आज प्रॅक्टिस असेल तर आजच निशांतशी बोलेन. पण तो काही ऑडीमध्ये दिसत नव्हता. ऑडीमध्येच काय कुठेच दिसत नव्हता निशांत. म्हणुन त्याला कॉल केला. तर तो कॉल काही घेत नव्हता. "आता या मुलाला काय झालय नक्की". स्वतःशी बडबडत मी कॅन्टीनमध्ये बघायला गेले. निशांत कुठेच नव्हता. ना कॅन्टीनमध्ये.., नाही लायब्ररीत की, क्लासरूमध्ये. स्वतःच्या क्लासरूमधे आले तर, तर आज हर्षु ही आली नव्हती. आजचे लेक्चर्स अर्धे संपवुन मी आज पहिल्यांदाच कॉलेजला बंक मारत निशांतला भेटायला निघाले. ऑटोने त्याच्या बंगल्याजवळ पोहोचले. आत जाताच गार्डनमध्ये आजोबा नवीन झाडं लावत बसले