रंग हे नवे नवे - भाग-8

(17)
  • 13.4k
  • 6k

'मैथिली मला आता जाम भूक लागली आहे. चल काहीतरी खाऊ', विहान म्हणाला. 'किती भुक्कड आहेस रे तू!', मैथिली म्हणाली. 'ए बाई तुझं भरलं असेल पतंग उडवून पोट. माझं नाही भरलं मला खायलाच लागतं', विहान म्हणाला. 'बर चल.', आणि ते तिथून निघाले. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी order दिलीे. 'चला खाऊन घ्या काही दिवसांनी हेच खुप मिस करणार', विहान म्हणाला. 'म्हणजे??', मैथिली म्हणाली. 'अग मला जायचं आहे न परत अस काय करते!', विहान म्हणाला. 'तू चेष्टा करतोय ना!', मैथिली थोडं गंभीर होत म्हणाली. 'नाही मैथिली मी जाण्याविषयी चेष्टा का करणार? अडीच महिने होऊन गेले, मॅडम आता निघायला हवं.', तो म्हणाला. मैथिलीचा चेहराच उतरला.