सकाळच्या कोवळ्या किरणांनी माझी झोपमोड केली... खरतर उठायची बिलकुल इच्छा नसताना मी किलकिले डोळे करून घडाळ्यात पाहिलं आणि ताडकन उठले... कारण सकाळचे दहा वाजता होते. पळत फ्रेश व्हायला गेले. तय्यार होऊन खाली आले तर आई- बाबा डायनिंग टेबलवर गप्पा मारत नाश्ता करत होते.. "अग आई..., मला उठवलं का नाहीस..?? दहा वाजून गेलेत उशीर होईल मला जायला..." मी ओरडतच खुर्चीवर बसले. माझ्या अशा बोलण्याकडे दोघेही आश्चर्याने माझ्याकडे बघत होते... आणि अचानक हसायला लागले.. मी जरा चिडूनच विचारलं, "काय झालं..??".... "मग काय हसु नको तर काय करू.. संडे आहे आज म्हणुन तुला उठवलं नाही.." आईच्या या वाक्यावर मी मोबाईलमध्ये पाहिलं.. आज खरचं