ती माणवी आकृति आता झाडामागून पुर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पहात होती... मी पन त्याच्या कडे पाहू लागलो, तसा मनात एक विचार चमकुन गेला की काल रात्रि हीच आकृति माझ्या मागे होती.. आणि सर्रर्रर्रर्रर्र कन अंगावर काटा आला... ते कोणतीही हलचाल करत नव्हते तरी माझ्या डोळयाच्या लवणा-या पापणीसोबत ते पुढ येत असल्यासारख वाटु लागल. पापणी मिटुन उघडली की अंतर कमी होऊ लागले... खुपच विचित्र वाटू लागल तसा मी तीथुन जायच ठरवल. तोच मागुन एक हाक ऐकु आली... आणि माझ अंग शहारल "संजु...... " थंड वा-याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारख वाटल..तो गौरीचा आवाज होता... मी मागे वळतच म्हणालो... "गौरी ........ किती