मला काही सांगाचंय...- १६-१

  • 9.2k
  • 3.9k

रुग्णवाहिका कुमारला जिल्हा रुग्णालय येथून घेऊन निघाली . सूर्य डोक्यावर आलेला ... आजूबाजूला धुराचे लोट तर रस्त्यात वाहनांची गर्दी , सुरळीत वाहतूक सुरु राहावी यासाठी मध्येच येणारे स्पीड ब्रेकर ... चौक आला की लाल दिवा लावून ट्रॅफिक सिग्नल वाटेत एक आणखी नवा सोबती थांबायला भाग पाडत होता तर एकीकडे भरधाव वेगाने एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली ... कुमारला मात्र या सगळ्या गोष्टींची काहीएक जाणीव नव्हती ... त्याचे वडील मायेनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते . तो जणू डोळे मिटून या दुनियेपासून अलिप्त अश्या वेगळ्याच दुनियेत हरवला होता... त्याच्या मागेच काही अंतर ठेवून ऑटोने त्याची आई , प्रशांत आणि आकाश येत होते