रंग हे नवे नवे - भाग-7

(19)
  • 12.5k
  • 6.5k

'अरे यार ह्याला राग आला वाटतं, श्शी.. काय करु आता? तो पण बरोबर म्हणतोय तो थोडीच दरवर्षी राहणार आहे, पण त्यानेही समजून घ्यायला नको का की असेल मला काम? पण विहान चिडला, सहसा तो चिडत नाही, काय मागत होता तो मला थोडासा वेळच ना! काय झालं असतं मी हो म्हणाले असते तर? उगाचच नाही म्हणाले. काय करू विहान सोबत जाऊ का? हो जातेच. तो पुन्हा पुन्हा नाही येणार इथे.', अाणि तिने विहानला कॉल केला, त्याने तो कट केला. 'बापरे विहान अस कधी करत नाही. आज भलताच राग आलेला दिसतो ह्याला.' विहान please pick up the phone तिने message ड्रॉप केला.