वरची खोली

  • 6k
  • 2k

कथा -वरची खोली ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली ...मी पण साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या साईटवर आलो , गाव लहान असल्यामुळे थोड्या मुदतीसाठी इथे किरायाने खोल्या मिळणार नाहीत "याची कल्पनां लॉजवाल्यांनी देत .आमच्यासाठी छान व्यवस्था करून देतो असे कबूल केले ,आमची वर्किंग टीम १०-१५ जणांची होती ,कधी कमी तर कधी जास्त मेम्बेर्स असत .अशी आमची टीम एक लॉज मध्ये राहू लागली