जुळले प्रेमाचे नाते- भाग-१६

(20)
  • 11.9k
  • 5.7k

सकाळच्या किरणांनी माझी झोपमोड केली... जणू काही ती सांगत होती की, उठ सकाळ झालीये. बाहेर वेगवेगळे पक्षी गात होते... जस की कोणी मॉर्निंग सॉंगच लावलं असाव. छान सकाळ झाली होती. मी उठुन खितकीत जाऊन बसले. समोर दूरवर पसरलेला समुद्र कालच्या आठवणी ताज्या करून गेला.. आज आमचा शेवटचा दिवस होता रत्नागिरी मधला. काल निशांतने मला सुंदर पद्धतीने सॉरी म्हटलं होतं, सोबत छान सरप्राईज ही दिल होत. आणि त्याच्या मनात हर्षु आहे हे तिच्याकडे बघुन कौल ही दिला होता. यासर्वात सर्वात जास्त मलाच वाईट वाटत होतं.. तेच मनाला कळत नव्हतं की, मला का वाईट वाटत आहे. त्यात भर म्हणून की काय.., हर्षु