ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 11

(63)
  • 28.7k
  • 1
  • 16.8k

क्रमशः प्रीती तिचे एका हातातील बॅग खाली ठेवण्यासाठी आपले दुसऱ्या हातानी मोकळे सोडलेले केस सावरत खाली वाकते आणि सकाळच्या त्या सोनेरी किरणात प्रीतीचे गळ्यात असणाऱ्या त्या मंगळसूत्राची सोनेरी किरणे थेट आर्यनच्या नजरेला जाऊन भिडतात. त्या प्रखर किरणांचा स्पर्श होताच आर्यनचे डोळे नकळत पाणावतात आणि त्याची दोन्ही मने एकमेकांचे सांत्वन करण्यात मग्न होऊन जातात.. हा त्याचे मनाला बसलेला एक धक्का कमीच असतो तोच एक छोटी मुलगी त्या गाडीतून आपल्या बोबड्या आवाजात आई.. आई.. म्हणत हळू हळू चालत चालत येते आणि प्रीतीचा पायाला पकडते.. इतके दिवस प्रीतीचे मिलनाची वाट पाहणारे ते डोळे.. पण आता त्या डोळ्यांना ती आपल्या नजरे समोर असून देखील