आपली कर्म आपल्यालाच भोगायला लागतात ह्या जन्मात नाहीतर भविष्यात का फुकट त्या देवाला कोसताय. आत्ता भोगा म्हणावं केलेली कर्म. आजी पुटपुटु लागली. रम्या तू आतमध्ये झोप जा. आईच्या एका आवाजात रम्या बाबाच्या पुढ्यात जावून आडवा झाला.आपलीच कर्म म्हणजे काय हो आई? रम्याच्या आईने आश्चर्याच्या भावात आजीला म्हणजे तिच्या सासुला विचारले.आपलीच कर्म नाहीतर काय बोलू आजीचा आता पारा सुटला, रम्याच्या पंजोबाच्या वेळेचं हे गूढ आता बाहेर येतंय. आणि त्यावेळच गुन्हा! ह्या बारीक मुलांना त्यांची काहीही चूक नसताना भोगाव लागतंय. आई काय बोलताय तुम्ही? कसल गूढ? आणि काय प्रकरण आहे हे ? काय केलय त्यांनी ? मंगेशचे (रव्याचे वडील) आजोबा आणि