मित्र my friend - भाग १३

  • 6.6k
  • 3k

जरा दूरचं होतं ते ठिकाण , तरीसुद्धा पोहोचला. त्याचवेळेला पावसाने सुरुवात केली... काय यार हा पाऊस... नको त्यावेळेला नको त्या ठिकाणी येतो, वैताग नुसता. विवेकला पाऊस तसा आवडायचा नाहीच. पावसातला चिखल, चिकचिकपणा.. अजिबात आवडायचा नाही. आजही ऐनवेळेला येऊन विवेकला अडचणीत आणलं त्याने. तरी केशव भेटेल म्हणून त्याने पावसाचा राग आवरता घेतला. विवेक त्याच्या घरी पोहोचला. केशवनेच दरवाजा उघडला. " पटकन आत ये. " विवेकला आतमध्ये घेतलं. आजूबाजूला कोणी नाही बघून दरवाजा बंद केला केशवने. " आई... दोन चहा घेऊन येते का ? " केशवने आईला बाहेरून आवाज दिला. आणि विवेकला एका वेगळ्या रूममध्ये घेऊन आला. घर मोठ्ठ होतं. विवेक