गोकुळाष्टमी जन्माष्टमी म्णजे गोकुळ अष्टमी हा कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. . भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे. श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी आहे कृष्णाचा मामा