कॉलगर्ल - भाग 2

(27)
  • 63.4k
  • 2
  • 48.3k

ठीक ठीक म्हणत यश पुढच्या कामाला लागला. लॉन्चर समुद्रात निघाली. समुद्राच्या लाटा बोटीला धडकत. त्यामुळे बोट हळूच डूचमळे. समुदपक्षी मासे खाण्यास समुद्रावर घिरट्या मारत असत. हिरवी गर्द झाडी, ओळीत नारळाची झाडे, निळाशार समुद्र, मोठे नयनरम्य दृश्य होते. लॉन्चर पाणी कापीत समुद्रात शिरली. अंतर कापीत साईटवर आली. “चला सायबानु, sample घ्यायचा ना?” बबनच्या बोलण्याने यश भानावर आला. त्याच्या डोक्यातून हडळ अन केसांच्या पुंजक्याचा विषय जात नव्हता. दिवसभर तो त्याच तंद्रीत होता. फोरेस्ट ऑफिसरने ही फोनवर या गोष्टीला दुजोरा दिला. तसेच अशा घटनेमुळे दोन कर्मचार्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला. बबनच्या बोलण्यात तथ्य होतं. यशला आता त्या रस्त्यानं