रंग हे नवे नवे - भाग-3

(12)
  • 17.6k
  • 12.8k

शेवटी दोघांच्याही भेटीचा दिवस उजाडला. 'मैथिली अगं थोडं तरी तयार होऊन जा.' तिची आई म्हणाली. 'आई मी जात आहे हेच खुप नाही आहे का तुझ्यासाठी.', ती म्हणाली. 'बर जा बाई, तुला जे करायचं ते कर.' तिची आई म्हणाली. मैथिली तिथे पोहचली. आदितीने दोघांनाही एकमेकांचे contact नंबर दिले होते. तिथे कुणीही दिसलं नाही, म्हणून मैथिलीने कॉल केला. विहान आतमध्येच बसून होता त्याने तिला ती exact कुठे आहे ते सांगितलं आणि ती तिथे गेली. तो त्याच्या mobile मध्ये गुंग होता. तीच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली 'Hii, I'm मैथिली.' त्याने वर पाहिलं आणि मैथिली जवळजवळ ओरडलीच 'तू...…..इथे.', 'तू आहेस मैथिली???', तो म्हणाला.