संकटांवर मात - भाग ९

  • 6.9k
  • 2.8k

भाग ९ - संकटांवर मात प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. राजांच्या पायाला स्पर्श करणार तोच राजांनी त्याच्या खांद्याला पकडलं अन म्हणाले, शिवा ss .. अरे कुठे होतास तू? अन अशाही अवस्थेत तू गड चढून आलास. कशी रे ??? कशी एवढी हिम्मत येते तुमच्यात.? राजांनी शिवाला घट्ट आलिंगन दिले. हातातलं सोनेरी कडं काढलं अन शिवाच्या उजव्या मनगटात घातलं. राजं... जन्माचं सार्थक झालं बगा माझ्या... तुमच्या हातून ह्यो मानमरातब. आन तुम्ही या गरीबाला छातीशी कवटाळलंत... आणखी काय पायजे आमास्नी... तुमच्यासाठी एक काय