रंग हे नवे नवे - भाग-2

  • 17.7k
  • 2
  • 13.4k

मैथिली पण घरी आली आता मात्र तिला लग्नाचा क्षीण जाणवत होता. आणि आजपासून आदिती पण नसणार ह्याच ही दुःख खूप होत तिला. क्षणाक्षणाला तिची आठवण येत होती. पण थकव्यामुळे तिला कधी झोप लागली तिला कळलं ही नाही. दुसऱ्या दिवशी ती सकाळी थोडं उशिराच उठली त्यामुळे तिला खूप फ्रेश वाटत होतं. एव्हाना ती कालच विहान सोबतच भांडण विसारलीही होती. ती होतीच मुळात तशी म्हणजे राग ही लवकर यायचा आणि शांतही तितक्याच लवकर व्हायची. जे आहे ते तोंडावर बोलून मोकळी मनात काहीही ठेवत नव्हती. त्यामुळेच ती स्वच्छंदी जगायची. इकडे विहान मात्र अगदी विरुद्ध त्याला स्वतःचा फार अभिमान होता. आणि कुणाचंही न