10दुसरा दिवस उजाडला,,त्या दिवसाप्रमाणेच आज तिघेच पहाटे पहाटे वाड्याकडे निघाले होते.आज तस वातावरण साफ वाटत होत... गारवा पण कमी होता.हळूहळू करत करत तिघेही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले.मागच्या वेळेसच अनुभव आजही श्रीधरच्या अंगावर काटा आणत होता."लक्षात ठेवा आपण चाललो तर आहे,तिघे जात आहोत,येताना एकत्र तिघेही येउ नाहीतर एकही नाही,,कारण तिघांपैकी एकजण जरी वाचलो तरी त्या प्रसंगाची आठवण आपल्याला आतुन मारून टाकेल",श्रीधरच्या बोलण्याचं दुःख कळून येत होत.विजू त्याला उत्तर देत बोलला,"आज नाही श्रीधर ,आज मी तसा प्रसंग पुन्हा येऊच देणार नाही"झालं तर मग,विठ्ठलाचं नाव घेऊन तिघेही निघाले टेकडी चढायला ,टेकडी चढताच समोर वाडा उभा होता.वाड्यात आतमधे घुसणार तोच कविताने मृगरस तिघांवर सुद्धा शिंपडला,त्याचा