दुख्खद वार्ता - भाग ७

  • 7.8k
  • 2.9k

भाग ७ - दुख्खद वार्ता प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. शास्ताखानाची मोहीम फत्ते झाली होती. चारपाचशे मुघल कापले गेले होते तर पाच पन्नास मावळे कामी आले होते. पण शास्ता खानाला जीवानिशी मारता आले नाही, म्हणून राजे जरा विचारात पडले होते. कारण, अजून जर खान थांबला तर मात्र स्वराज्यातील जनतेला होणार त्रास कसा थांबवावा? दुसऱ्या दिवशी जखम दरबारामध्ये खानाच्या छाप्यामध्ये कामी आलेल्या मावळ्यांची नावे वाचून दाखवली जात होती. शिवा पांढरेचं नाव ऐकताच येसाजी कंकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पथकातील तरबेज