विरह - भाग ६

  • 10.1k
  • 4.4k

भाग ६ - विरह प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. सदरेवर कारस्थानं शिजू लागली होती. राजांनी मुख्य सरदार अन कारभारी मंडळी यांच्यासोबत मसलती करून योजना नक्की केली होती. हजार दिड हजार मावळ्यानिशी लालमहालावर छापा घालून शास्ताखानाला संपवायचा कट नक्की झाला होता. आधीच एका सरदाराला शे दोनशे मावळ्यांसह शास्ताखानाच्या फौजेत सामील होण्यासाठी धाडून दिलेले होते. दिवस अजून ठरला नव्हता. इकडे शिवाला पारूला भेटायची आस लागली होती. एक एक दिवस कसाबसा ढकलत होता. सुभेदार येसाजी कंक यांच्याकडे दोन तीन वेळा, 'एकदा