मित्र my friend - भाग ६

  • 11.1k
  • 3.9k

संदीपचं घर आणि कपड्यांचे दुकान शेजारी -शेजारी होते. " तू मघाशी फोन लावला तर कोणी उचलला ? " प्रियाने विचारलं. " कोणीतरी सँडी बोलत होता.. मी लगेच ठेवून दिला फोन.. ", "अरे.. बाळा... सँडी म्हणजे संदीप... तुला माहीत नाही का.. " प्रिया जोरात हसली. आता यात काय हसायचं एवढं... विवेकने दुरूनच बघितलं.. दुकान मोठ्ठ होतं ,शिवाय आजूबाजूला खूप सुधारणा झाली होती. ४ वर्षात खूप काही बदललं इथे.. विवेक आजूबाजूला बघत चालला होता.. इतक्यात त्याला " Wow !!! " अशी मोठयाने किंकाळी ऐकू आली. दचकला विवेक. समोर संदीप उभा... त्याच्या बाजूला प्रिया... नक्की कोणाला बघून ओरडला हा... असा विचार करत त्याच्या