ताईंन सांगा पदर नीट घ्या ( एका रात्रीचा भुताचा अनुभव )

(19)
  • 19.3k
  • 1
  • 5.6k

ताईंना सांगा पदर नीट घ्या' © By Sanjay Kamble रात्र बरीच झाली होती. . बाईक वरून तो आपल्या घरी जायला निघाला.... काही दिवसांपूर्वीच त्याला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी करून तो खुपचं थकुन जात असे. आॅफिसवरून बाहेर पडला त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक त्याला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते. तोही त्यांच्या सोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघाला... मुख्य रस्त्यावरून त्यांचे मार्ग बदलत होते.. जो तो आपापल्या निवा-याच्या दिशेने निघुन जाई... नोकरदार मंडळीच शेवटी. कुणाच स्वताच घर होतं तर कोणी भाड्यान रहात असे... तो ही बाईक वरून निघाला..