चांदणी रात्र - १०

  • 9.5k
  • 2.6k

स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडला. संदीप व राजेश मैदानावर पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषाली सुद्धा तिथे आल्या. स्पर्धेची वेळ झाली. सर्व स्पर्धक आपापल्या जागी उभे होते. रेफरीने शिट्टी वाजवताच सर्वांनी पोजिशन घेतली. राजेशने वृषालीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली व राजेशमध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. रेफरीने दुसरी शिट्टी दिली व सर्व स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. राजेश वाऱ्याच्या वेगाने धावत होता व एकेकाला मागे टाकत होता. आता अगदी थोडं अंतर बाकी होतं. राजेशच्या पुढे एकच मुलगा होता. राजेशचे पाय आता घाईला आले होते पण तरीही तो पूर्ण ताकदीनिशी धावत होता. आता राजेश आणि तो मुलगा एका रेषेत धावत होते. अखेरीस राजेशने फिनिश